‘जिवंत सातबारा मोहीम’ बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च ते 31 मार्च राबवणार! जाणून घ्या सविस्तर

बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील तहसीलदार श्री.संतोष काकडे यांनी ‘जिवंत सातबारा मोहीम‘ चालू केली आहे.या राबवत असलेल्या मोहिमेची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दखल घेतली आणि ही मोहीम सर्व जिल्ह्यात राबवण्याचे आदेश दिले आहेत.या संदर्भाचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे.

महसूल विभागाच्या 1०० दिवसांच्या कृती कार्यक्रम आराखड्यामध्ये या मोहिमेची माहिती पुरल्या जाणार आहे.1 मार्च पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये मयत/मृत्यु झालेल्या सातबाऱ्यावरील खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वारसांना त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे वेळेत मिळावी हा यामागील मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय? 

सातबारा वरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अपडेट/अद्यावत करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.आपल्याला माहीतच आहे की मयत झालेल्या खातेदाराच्या वारसांना त्यांच्या शेतजमिनीचे हक्क मिळवण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या मोहिमेमुळे शेतजमिनीचे हक्क मिळवणे सोपे होणार आहे.यासाठी महसूल विभागाने ई-हक्क प्रणालीचा वापर करण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी होणार आहे. 

जिवंत सातबारा मोहीम केव्हा राबवली जाणार?कशी असेल मोहिमेची प्रक्रिया?

1 मार्च ते 5 मार्च दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या काम करत असलेल्या क्षेत्रातील मयत खातेदारांची यादी तयार करणे

6 ते 15 मार्च मयत झालेल्या खातेदाराच्या वारसांनी लागणारी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याजवळ सादर करणे. नंतर मंडळ अधिकारी यांच्या तर्फे स्थानिक चौकशी अहवाल ठराव मंजूर करून घेणे.

16 ते 31 मार्च वारसाची फेरफार तयार करने तसेच केलेल्या अर्जांना शेवटची मंजूरी देणे.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  • मयत खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यूचा दाखला.
  • सर्व वारसांच्या वय पुराव्याच्या साक्षांकित प्रति.
  • सर्व वारसांच्या आधार कार्डच्या साक्षांकित प्रति.
  • वारसा बाबतचे विहित नमुन्यातील शपथपत्र आणि स्वयंघोषणापत्र तसेच सर्व वारसांच्या लिखित सह्या.
  • अर्जातील सर्व वारसांचा पत्ता आणि संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा पुरावा. 

‘जिवंत सातबारा मोहिम मुळे होणारे फायदे

  • वारसांना शेतजमिनी संबंधित हक्क मिळवण्यासाठी सोपे होईल.
  • सोपी आणि पारदर्शक स्वरूपाची पद्धत असल्यामुळे लवकरात लवकर कामे होतील तसेच जुन्या प्रक्रियेला आळा बसेल.
  • ई-हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज त्यामुळे प्रक्रिया जलद आणि सोपी होणार. 

जिल्हास्तरीय मोहीम राबवण्याचा निर्णय 

चिखली मधील तहसील कार्यालयाने सर्वप्रथम या मोहिमेची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी या मोहिमेची दखल घेतली. आणि ही मोहीम पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला.महसूल विभागाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ही मोहीम प्रभावी आणि यशस्वीपणे राबवली जात आहे. 

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांसाठी आवाहन 

अजून पर्यंत ज्या वारसाची नोंद सातबाऱ्यावर झालेली नाही.अशा वारसांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिवंत सातबारा मोहीम वारसांना शेतजमिनीच्या कायदेशीर हक्कासाठी मदत करणारी ठरणार आहे त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.या महत्वाकांशी मोहिमेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.

यासारख्या अनेक योजनांचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी https://mhdailyupdate.in/ ला भेट द्या.धन्यवाद

Leave a Comment