“मोफत मोबाईल शॉप ई-व्हेईकल:दिव्यांग योजना महाराष्ट्र 2025 सुवर्णसंधी!”

मुख्यमंत्री दिव्यांग योजना महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उद्योजकतेला चालना देण्यासाठी मोफत हरित उर्जेवर चालणारे मोबाइल शॉप ऑन ई-व्हेईकल उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येत आहे.या दिव्यांग योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत, हरित उर्जेवर चालणारी पर्यावरणस्नेही फिरती वाहने मोफत प्रदान केली जातात, ज्यामुळे आशा व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री दिव्यांग योजना महाराष्ट्र नोंदणी कालावधी: 

नोंदणी पोर्टल सुरू – अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल दिनांक २२.०१.२०२५ पासून ते

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ०६.०२.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.

दिव्यांग बांधवांनी ही संधी गमावू नये.ऑनलाईन अर्ज करा आणि स्वावलंबनाचा मार्ग स्विकारा.

दिव्यांग योजना महाराष्ट्र 2025

आवश्यक कागदपत्रे:

  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी )
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  2. ‘नोंदणी’ किंवा ‘रजिस्टर’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज सादर करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

योजनेचे उद्देश:

  • दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे.
  • हरित उर्जेचा वापर करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावणे.
  • दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे.

पात्रता निकष:

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • वैध दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा आणि इतर निकषांसाठी mshfdc.co.in या संकेतस्थळावर तपशील उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती आणि कागदपत्रे नीट तपासा. अधिक माहितीसाठी mshfdc.co.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

दि. २७ सप्टेंबर २०२३ दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याचा दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करून देणेबाबत (शुद्धीपत्रक).

दिव्यांग बांधवांनी निराशा झटकून महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि “मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्” या उक्तीला साकार करावे.

यासारख्या अनेक योजनांचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी https://mhdailyupdate.in/ ला भेट द्या.धन्यवाद


Leave a Comment