सरकारने नागरिकांना मोफत वीज मिळावी तसेच उरलेली जास्तीची वीज विकून पैसे कमवता यावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजना चालू केलेली आहे.पीएम सूर्य घर योजना पात्रता आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे आपण खाली बघणार आहोत.सरकारच्या या free solar panel yojana मुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2650 घरगुती ग्राहकांनी फायदा घेतला आहे तसेच त्यांना यामुळे मोफत वीज मिळत आहे आणि त्यांच्या पैशांची पण बचत होत आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर योजना म्हणजे काय आहे?
या योजनेमध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती करणारे पॅनेल्स बसवल्या जातात आणि या सौर पॅनलमार्फत वीज निर्मिती होते.आपण करत असलेल्या घरगुती वापरापेक्षा जास्तीची वीज निर्मिती झाली असेल तर तयार झालेली जास्तीची वीज आपण महावितरणच्या लाईन मध्ये पाठवून उत्पन्न कमवू शकतो.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी केंद्र सरकारकडून अनुक्रमे
1 किलोवॅट – ₹30,000
2 किलोवॅट – ₹60,000
3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक – ₹78,000
अनुदान मिळते.
या योजनेचे इतर फायदे:
- घरांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळते.
- घरांना सवलतीच्या दरात बँक कर्ज मिळते.
- अक्षय उर्जेचा वापर वाढतो.
- देशाच्या उर्जा विभागाला बळकटी मिळते.
- ग्राहकांचे विज बिल शून्य होऊ शकते.
- मोफत वीज मिळते.

पीएम सूर्य घर योजना पात्रता
1.कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
2. आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
3. तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
पीएम सूर्य घर योजना कागदपत्रे
1.आधार कार्ड
2.बँक पासबुक
3.चालू विज बिल देयक
4.घर मालकीचे प्रमाणपत्र
5.कलर पासपोर्ट फोटो
6.मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला)
पीएम सूर्य घर योजना अर्ज कसा करावा?
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागते.प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची अंमलबजावणी महावितरण खात्याकडे सोपवण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी http://pmsuryaghar.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. यासाठी दिलेल्या स्टेप बाय स्टेप
फॉलो करा.
- राष्ट्रीय पोर्टल www.pmsuryaghar.gov.in वर जा.
- नोंदणीसाठी आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
- तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
- तुमचा वीज ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
- ईमेल प्रविष्ट करा.
- पोर्टलच्या निर्देशानुसार अनुसरण करा.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असावे.
- कुटुंबाने याआधी सौर पॅनेलसाठी इतर कोणतेही अनुदान घेतलेले नसावे.
पीएम सूर्य घर योजनेसाठी बँकेकडून कर्ज मिळते का?
हो,पीएम सूर्य घर योजनेसाठी बँकांकडून कर्ज मिळते.पीएम सूर्यघर योजनेसाठी एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि बँक ऑफ बडोदा या बँका कर्ज देतात.
घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.बँकांनी कर्ज घेण्याची सुविधा सोपी केली आहे. ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महावितरणाने ग्राहकांना सोलर नेट मीटर (सौर ऊर्जेपासून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला विकण्यासाठी वापरला जाणारा मीटर) मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मीटरमुळे विज निर्मिती किती झाली,वीज वापर किती झाला तसेच जास्तीच्या युनिटची माहिती रोजच्या रोज मोबाईल फोनवर मिळेल.यामुळे आपण किती वीज वापरतो याचे नियोजन करता येणार.अशाप्रकारे ग्राहकांचे विज बिल कमी किंवा शून्य येऊ शकते.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे महावितरण खात्याने म्हटले आहे.
असे महत्त्वाचे अपडेट आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा.तसेच तुम्ही https://mhdailyupdate.in/ ला भेट देऊ शकता.धन्यवाद
हे वाचा