पुरवठा विभागाद्वारे रेशन धारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना! रेशन ई-केवायसी (rashan card ekyc) पूर्ण करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ आहे.दिलेल्या तारखेच्या आत रेशन ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन (शिधापत्रिके) मधून आपले नाव वगळले जाऊ शकते.तसेच शासकीय स्वस्त धान्य मिळण्यापासून आपण वंचित राहू शकता.म्हणजेच आपल्याला राशन मिळणे बंद होऊ शकते.त्यासाठी लवकरात लवकर आपण rashan card ekyc करून घ्या.असे आवाहन करण्यात आले आहे.राशन लाभार्थ्यांची ओळख व पत्यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया आवश्यक आहे.
पुरवठा विभागाने रेशन ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे.अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे सांगितले आहे.शिधापत्रिकेत एक eKYC म्हणजे काय?ई-केवायसी करणे का आवश्यक आहे?ती कशाप्रकारे करावी?ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होऊ शकतात?ते आपण सविस्तर बघणार आहोत.
शिधापत्रिकेत eKYC (rashan card ekyc) म्हणजे काय?
eKYC म्हणजे (Electronic Know Your Customer) ही एक डिजिटल पडताळणी प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्थांना ग्राहकाची ओळख ऑनलाईन प्रमाणित देण्यासाठी वापरली जाते.
रेशन ई-केवायसी (e-KYC) करणे का आवश्यक आहे?
रेशन ई-केवायसी केल्यामुळे बोगस रेशन धारक ओळखले जातात.
धान्य वाटप करण्याची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी.
आधार क्रमांक पडताळणी केल्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच योग्यरीत्या रेशन दिल्या जाते.त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसतो.
सरकारने सर्व शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक केली आहे. नाहीतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळणार नाही.
बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात.
राशन कार्ड केवायसी कसे करायचे?/ई-केवायसी कशी करावी?
तुम्ही जिथून राशन घेता अशा जवळच्या रेशन दुकानाला भेट द्या.
जाताना तुम्ही सोबत आधार कार्ड तसेच रेशन कार्ड ची एक झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जा.यामुळे रेशन पडताळणी करणे सोपे होईल.
रेशन दुकानदार तुमचा अंगठा पीओएस (POS) मशीनवर ठेवेल आणि तुमची सत्यता पडताळेल.मशीन द्वारे तुमचा अंगठा स्कॅन केल्या जाईल.अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.अशाप्रकारे तुम्ही घरातील सर्व सदस्यांची राशन केवायसी पूर्ण करून घ्या.
रेशन ई-केवायसी न केल्यास काय परिणाम/नुकसान होईल?
यात सर्वात मोठे नुकसान म्हणजे राशन मिळणे बंद होईल.
शिधापत्रिकेमधून तुमचे नाव वगळण्यात येईल.
सरकारी स्वस्त धान्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
रेशन कार्ड यादीमध्ये नाव न राहिल्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागेल.
तालुक्या नुसार आतापर्यंत किती रेशन लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नाही?
ration card ekyc maharashtra मध्ये ३,७४,३३५ रेशन धारकांना स्वस्त धान्य पुरवले जाते.त्यातील ३२.६५% लाभार्थ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
अचलपूर- ७६,४५६
मोर्शी- ३६,३६३
अंजनगाव- ३५,७०२
चांदूर बाजार- ६१,३३०
धामणगाव रेल्वे- २८,७३६
धारणी- ५९,३९९
वरुड- ४२,६४२
आतापर्यंत तुम्ही राशन कार्ड केवाईसी (rashan card ekyc) केली नसेल,तर आजच जवळच्या रेशन दुकानाला भेट द्या.रेशन दुकानदाराकडे प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घ्या.
FAQ
राशन कार्ड केवाईसी लास्ट डेट महाराष्ट्र?
रेशन ई-केवायसी (rashan card ekyc) पूर्ण करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे.
यासारख्या अनेक योजनांचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी https://mhdailyupdate.in/ ला भेट द्या.धन्यवाद
- ‘जिवंत सातबारा मोहीम’ बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च ते 31 मार्च राबवणार! जाणून घ्या सविस्तर
- rashan card ekyc १५ फेब्रुवारी शेवटची तारीख नाहीतर रेशन होईल बंद
- नवीन शासन निर्णय मंजूर!शेतकऱ्यांना रेशन ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी 170 रुपये मिळणार
- Ladki Bahin Yojana: सरकारची मोठी कारवाई!अजून 22,000 लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले, ही आहेत कारणे
- पीएम सूर्य घर योजना पात्रता घराला मोफत वीज! जिल्ह्यात 2650 ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ!